टप्पू, गोलीनंतर आता ‘तारक मेहता..’मधून आणखी एकाची एक्झिट? अभिनेत्याने सोडलं मौन

टप्पू, गोलीनंतर आता ‘तारक मेहता..’मधून आणखी एकाची एक्झिट? अभिनेत्याने सोडलं मौन

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही वर्षांत या मालिकेतील बरेच कलाकार बदलले गेले. आता आणखी एका कलाकाराने या मालिकेला रामराम केल्याची जोरदार चर्चा आहे. या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणारा अभिनेता शरद सांकला याने शो सोडल्याचं म्हटलं जात आहे. शरद गेल्या 16 वर्षांपासून या मालिकेत काम करतोय. ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडल्याच्या चर्चांवर अखेर शरदने प्रतिक्रिया दिली आहे.

शरदने या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं आहे. “मी अजूनही तारक मेहता.. या मालिकेत काम करतोय आणि यापुढेही करत राहणार आहे. मी मालिका सोडल्याच्या चर्चा खोट्या आहेत. मी कुठेच गेलो नाही. मी अजूनही या मालिकेचा भाग आहे. सध्या मालिकेचं कथानक अशा पद्धतीचं आहे, जिथे माझ्या भूमिकेला दाखवलं जात नाहीये. पण अब्दुल लवकरच मालिकेत परतणार आहे. अब्दुलच्या भूमिकेमुळे मला लोकप्रियता मिळाली आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तारक मेहता ही मालिका खूप चांगली असून ती दीर्घकाळ चालणारी आहे. मी ही मालिका कशाला सोडू? मी या मालिकेला सोडण्याविषयी विचारसुद्धा करू शकत नाही”, असं त्याने ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Sankla (@sharad19sanklafp)

शरदने ‘तारक मेहता..’ या मालिकेशिवाय काही चित्रपटांमध्येही काम केलंय. यात ‘बाजीगर’, ‘हेराफेरी’, ‘खिलाडी’, ‘परवाना’, ‘हम हो गए आपके’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र ‘तारक मेहता..’मधील अब्दुलच्या भूमिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. गेल्या काही वर्षांत या मालिकेला काही कलाकारांनी रामराम केला आहे. काही दिवसांपूर्वीच गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने ही मालिका सोडली. त्याच्याआधी टप्पूची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचीही मालिकेतून एक्झिट झाली होती. मालिका सोडणाऱ्यांमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकच, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता यांचाही समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;