‘ते’ बघताच करिश्मा कपूर भावूक, अश्रू लपवत अभिनेत्री म्हणाली…

‘ते’ बघताच करिश्मा कपूर भावूक, अश्रू लपवत अभिनेत्री म्हणाली…

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने एक मोठा काळ गाजवला आहे. करिश्मा कपूर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून करिश्मा कपूर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वीच करिश्मा कपूर ही आपल्या दोन्ही मुलांसोबत विदेशात जाताना दिसली. करिश्मा कपूर हिचे खासगी आयुष्यही चांगलेच चर्चेत राहिलेले आहे. अभिषेक बच्चन याच्यासोबतचे नाते तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिचे लग्न दिल्लीचा व्यवसायिक संजय कपूर याच्यासोबत करण्यात आले. मात्र, लग्न होऊन काहीच दिवस झाले नाहीत तोवरच करिश्मा कपूर हिने पतीवर गंभीर आरोप केले.

फक्त आरोपच नाही तर अनेकदा संजय कपूर आपल्यासोबत काय करत होता हेच सांगताना करिश्मा कपूर ही दिसलीये. करिश्मा कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. करिश्मा कपूर ही चक्क भावूक झाल्याचे बघायला मिळतंय.

करिश्मा कपूर ही इंडियाज बेस्ट डांन्सर सीजन 4 मध्ये जज म्हणून दिसत आहे. नुकताच आता शोचा एक प्रोमो व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोच्या व्हिडीओमध्यचे करिश्मा कपूर ही भावूक होताना दिसत आहे. एक डांन्स पाहून करिश्मा कपूर ही भावूक झाली. ‘जीना यहा’ या गाण्यावर स्पर्धकांनी डान्स केला.

हा डांन्स पाहून करिश्मा कपूर भावूक झाली. करिश्मा कपूर म्हणाली की, माझे आजोबा हे पाहून खूप खुश झाले असते…यावेळी करिश्मा कपूर हिच्या डोळ्यांमधून अश्रू येताना देखील दिसत आहेत. उभे राहून टाळ्या वाजवतानाही करिश्मा कपूर ही दिसली आहे. आता करिश्मा कपूरचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

करिश्मा कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. करिश्मा कपूर हिच्यासोबत घटस्फोट घेणे संजय कपूर याच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. पोटगी म्हणून अत्यंत मोठी रक्कम करिश्मा कपूर हिला संजय कपूर याने दिली आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुलांचा सांभाळ करिश्मा कपूर ही एकटीच करते. हेच नाही तर संजय कपूरसोबतच्या घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने लग्नही केले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;