अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा आहेत तब्बल इतक्या कोटी संपत्तीचे मालक, मुलगी श्वेता आणि नात नव्या देखील….

अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा आहेत तब्बल इतक्या कोटी संपत्तीचे मालक, मुलगी श्वेता आणि नात नव्या देखील….

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. काैन बनेंगा करोडपतीमध्ये ते मोठे खुलासे करतानाही कायमच दिसतात. अमिताभ बच्चन यांच्या घरात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर लवकरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांनी भाष्य केले नाहीये.

दुसरीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लेक श्वेता हिच कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील प्रतिक्षा हा बंगला श्वेताच्या नावावर केला. हेच नाही तर श्वेता बच्चन आपल्या मुलांसोबत जलसा याच बंगल्यावर राहते.

श्वेता बच्चन हिचा पती निखिल नंदा हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. फक्त निखिल नंदा हाच नाही तर श्वेता आणि तिची लेक नव्या या देखील मोठ्या संपत्तीच्या मालक आहेत. अमिताभ बच्चन यांचा जावई निखिल नंदा याच्याकडे रिपोर्टनुसार 60 कोटींची संपत्ती आहे. निखिल नंदा ‘एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे.

अहवालानुसार 2021 पर्यंत या कंपनीचा महसूल 7014 कोटी रुपये (70 अब्ज) होता. रिपोर्टनुसार या कंपनीत निखिल नंदा यांचा पगार 13.1 कोटी रुपये आहे आणि ग्रुपमध्ये त्यांची 36.59% हिस्सेदारी आहे.  निखिल नंदा हा करिश्मा कपूरची आत्या रितू नंदा यांचा मुलगा आहे. श्वेता नंदा ही बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. 

हेच नाही तर नव्या नवेली नंदा ही देखील बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार नाहीये. नव्या ही वडील निखिल नंदा यांच्यासोबत त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची मदत करते. नव्या ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नव्या ही तिच्या शोमध्ये कायमच मोठे खुलासे करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच एक जाहिरात नव्या हिने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;