‘पाहिले न मी तुला’ नाटकात अंशुमन विचारे-हेमंत पाटील यांचा कल्ला

‘पाहिले न मी तुला’ नाटकात अंशुमन विचारे-हेमंत पाटील यांचा कल्ला

आपल्यातील सळसळत्या ऊर्जेचं दर्शन घडवत कोकणाचा ‘झिल’ अंशुमन विचारे जळगावचा ‘जाळंधुर’ लेक हेमंत पाटील या दोन्ही अतरंगी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने आजवर रसिकांचं मनोरंजन केलं. आता ‘पाहिले न मी तुला’ या नाटकातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला’ हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. ‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूमीवर आणणार आहे.

सहवासातल्या प्रेमाचे वेगवेगळे पैलू मांडणाऱ्या या नाटकात अंशुमन आजवरची सर्वात वेगळी भूमिका करणार आहे. “‘पाहिले न मी तुला’ नाटकाच्या निमित्ताने मला आणि हेमंतला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. याआधी आम्ही कधी एकत्र काम केलेलं नाही. माणूस म्हणून आणि ज कलाकार म्हणून हेमंत उत्तम आहे. त्यामुळे आमचं छान ट्यूनिंग जुळून आलं. निखळ मनोरंजनसोबत आमच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट प्रेक्षकांना या नाटकातून मिळेल,” असा विश्वास अंशुमन यांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by @pahilenamitula

अंशुमनबद्दल हेमंतने सांगितलं, “अंशुमन सर आणि मी पहिल्यांदाच काम करतोय. एक वेगळा अनुभव मिळतोय. अभिनेता म्हणून खूप छान प्रोसेस अंशुमन सर करत असतात. त्यांच्याकडून ती शिकण्यासारखी आहे. अंशुमन सर छान समजून सांगतात. समोरच्या नटाला काय अपेक्षित आहे हे त्यांना लगेच समजत त्यामुळे अस छान वातावरणात काम सुरू आहे. वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत. नाटकातल्या माझ्या पात्राचा सुद्धा ते सराव करून घेतात. नाटकासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही करतोय आणि त्यात अंशुमन सरांकडून खूप शिकायला मिळतंय. आम्ही पहिल्यांदाच सोबत काम करतोय पण असं वाटत नाही की पहिल्यांदा करतोय.”

22 ऑगस्टपासून ‘पाहिले न मी तुला’ नाटकाचा शुभारंभ झाला. गुरुवारी 22 ऑगस्टला पुण्यातील बालगंधर्व येथे रात्री 9.30 वाजता, शुक्रवार 23 ऑगस्टला रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रात्री 9.30 वाजता, शनिवार 24 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजता, शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी वाशीमधील विष्णुदास भावे याठिकाणी संध्याकाळी 4 वाजता नाटकाचे प्रयोग संपन्न होणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;