ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात जान्हवी कपूरने कापली होती स्वतःची नस! काय आहे संपूर्ण प्रकरण

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात जान्हवी कपूरने कापली होती स्वतःची नस! काय आहे संपूर्ण प्रकरण

Abhishek Bachchan – Aishwarya Rai Marriage: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. दोघांचं नातं आता घटस्फोटापर्यंत देखील पोहोचलं आहे… असं सांगण्यात येत आहे. पण यावर अद्याप कोणी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. पण दोघांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. तेव्हा दोघांच्या लग्नाला थांबण्याचा प्रयत्न जान्हवी कपूर हिने केला होता. ही घटना फार कमी लोकांना माहिती आहे.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न थांबण्यासाठी जान्हवी कपूर हिने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली होती. जान्हवी कपूर बॉलिवूडची अभिनेत्री नाही तर, एक मॉडेल होती. जान्हवी हिने मोठा दावा केला होता. अभिषेक बच्चन आणि माझं लग्न झालं आहे… असा दावा जान्हवी कपूर हिने केला होता.

 

 

अभिषेक बच्चन याने गुपचूप 2006 मध्ये माझ्यासोबत लग्न केलं आहे… असा दावा जान्हवी हिने केला होता. एवढंच नाही तर, जान्हवी हिने अभिषेक विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. पण कोणतेच पुरावे नसल्यामुळे जान्हवी पोलिसांसमोर काहीही साध्य करु शकली नाही. ज्यामुळे पोलिसांनी देखील तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न मोडण्यासाठी जान्हवीने सर्व प्रयत्न केले. दोघांच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी हिने स्वतःच्या हाताची नस कापली, ज्यामुळे अभिनेत्री रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं. लग्नाच्या दिवशी जान्हवीने गोंधळ घातला होता. ज्यामुळे लग्न सोहळ्याचा आनंद कमी झाला होता.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या लग्नात फार कमी लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार देखील लग्नात उपस्थित नव्हते. फार कमी पाहुण्यांच्या उपस्थित ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न 2007 मध्ये झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय अनेक मुलाखतींमध्ये देखील ऐश्वर्या – अभिषेक यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या – अभिषेक कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;