ऐश्वर्या रायचं मोठं वक्तव्य, ‘परिस्थिती माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी विचित्र…’

ऐश्वर्या रायचं मोठं वक्तव्य, ‘परिस्थिती माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी विचित्र…’

Aishwarya Rai: गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर अद्यावर अभिषेक – ऐश्वर्या किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऐश्वर्या राय हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री बॉलिवूडवर राज्य करत होती. पण लग्नानंतर ऐश्वर्या फार कमी सिनेमांमध्ये दिसते. ऐश्वर्या हिने अशा अनेक सिनेमांना नकार दिला, जे सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर सुपरहीट ठरले.

‘कुछ कुछ होता है’, ‘मुन्ना भाई MBBS’ आणि ‘भूल भुलैया’ यांसारख्या सिनेमांची ऑफर ऐश्वर्याकडे होती. पण अभिनेत्री सिनेमे करण्यात नकार दिला. फार कमी लोकांना एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘हॅप्पी न्यूअर’ सिनेमात देखील ऐश्वर्या हिला विचारण्यात आलं होतं. पण सिनेमात पती अभिषेक बच्चन असल्यामुळे अभिनेत्री सिनेमा करण्यास नकार दिला.

एका मुलाखतीत ऐश्वर्याने याबद्दल मोठा खुलासा केला होता. ‘हॅप्पी न्यूअर’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण और अभिषेक बच्चन यांच्यसोबत, विवान शाह, सोनू सूद आणि बोमन ईराणी देखील होते.

ऐश्वर्या म्हणाली होती, ‘हो… मला ‘हॅप्पी न्यूअर’ सिनेमासाठी विचारण्यात आलं होतं. सिनेमासाठी मी होकार दिला असता तर, एक आठवण कायमची मनात राहिली असती. पण सिनेमा माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी नव्हता. कारण सिनेमात आमची जोडी नव्हती… सिनेमात माझी आणि शाहरुखची जोडी होती. त्यामुळे माझ्यासाठी आणि अभिषेकसाठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे सिनेमात काण करण्यास मी नकार दिला…’ असं ऐश्वर्या राय म्हणाली होती.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमांमध्ये एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक अराध्या हिला जन्म दिला.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि आराध्या यांना स्पॉट केलं जातं. दोघींसोबत अभिषेक नसतो… त्यामुळे देखील दोघांमध्ये काही वाद सुरु आहेत… अशी चर्चा रंगलेली असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;