सोनाक्षीने जिथे केलं लग्न, तेच घर काढलं विकायला; खरं कारण आलं समोर

सोनाक्षीने जिथे केलं लग्न, तेच घर काढलं विकायला; खरं कारण आलं समोर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतंच बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. मुंबईतील वांद्रे इथल्या तिच्या निवासस्थानी हे लग्न पार पडलं होतं. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच सोनाक्षीने तिचं हे घर आता विकायला काढलं आहे. एका रिअल इस्टेट इन्स्टाग्राम हँडलवर सोनाक्षीच्या अपार्टमेंटचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. सोनाक्षीचं हे 2 बीएचके घर 4200 चौरस फुटांवर पसरलेलं आहे. वांद्रे पश्चिम याठिकाणी सी-व्ह्यू असलेल्या या अपार्टमेंटची किंमत 25 कोटी रुपये इतकी आहे. मात्र सोनाक्षीने लग्नाच्या काही दिवसांतच हे घर का विकायला काढलं, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला होता. त्याचं खरं कारण आता समोर आलं आहे.

‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षीने लग्नानंतर एक नवीन घर खरेदी केलं आहे. मात्र अद्याप तिने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सोनाक्षीच्या जवळच्या व्यक्तीने तिचं घर विकण्यामागचं कारण सांगितलं आहे. सोनाक्षीने त्याच इमारतीत एक मोठं घर विकत घेतलं आहे. म्हणूनच तिने जुनं घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या या नव्या घराला तिचा पती झहीरच डेव्हलप करत आहे. झहीरने 2019 मध्ये ‘द नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्याच्या कुटुंबाचा बांधकामाचा व्यवसाय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

गेल्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने सोनाक्षीने तिच्या घराची झलक दाखवली होती. हे घर सोनाक्षीसाठी खूपच खास आहे, कारण तिने स्वत: पहिल्यांदाच हक्काचं घर विकत घेतलं होतं. “वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यामुळेच मला स्वत:चं घर विकत घ्यायचं होतं. माझ्या बाबांनी पाटणाहून मुंबईला आल्यानंतर पहिलं घर खरेदी केलं होतं. ते घर आजही त्यांच्या नावावर आहे. बँडस्टँड इथलं ते 1 बीएचके अपार्टमेंट त्यांच्यासाठी महालापेक्षा कमी नाही. त्यांचा हा आनंद पाहून मला नेहमीच स्वत:चं घर विकत घेण्याची इच्छा होती. माझ्यासाठी ही खूप खास भावना आहे”, असं तिने म्हटलं होतं.

सप्टेंबर 2023 मध्ये सोनाक्षीने वांद्रे पश्चिम इथल्या बँड्रा रेक्लमेशनमधील 81 Aureate इमारतीच्या 26 व्या मजल्यावर घर विकत घेतलं होतं. सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांनी करारावर स्वाक्षरी केली होती. या अपार्टमेंटचा कारपेट एरिया 4210.87 चौरस फूट इतका आहे आणि त्यावेळी त्याची किंमत 11 कोटी रुपये इतकी होती. सोनाक्षीच्या या घरातून माहिमची खाडी आणि वांद्रे-वरळी सी लिंकचा नजारा दिसतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;