चांद्रयान मोहिमेच्या पुढील मंजुरीची ‘इस्रो’ला प्रतीक्षा, 4 आणि 5 चे डिझाईन तयार

चांद्रयान मोहिमेच्या पुढील मंजुरीची ‘इस्रो’ला प्रतीक्षा, 4 आणि 5 चे डिझाईन तयार

चांद्रयान-4 आणि 5 चे डिझाईन तयार असून पुढच्या पाच वर्षांत अवकाशात तब्बल 70 उपग्रह सोडण्याचे ध्येय असल्याचे इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. पुढच्या चांद्रयान मोहिमेसाठीची मंजुरी सरकारकडून अद्याप मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच पुढच्या मोहिमेला सुरुवात करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.  चांद्रयान 4 च्या मोहिमेदरम्यान अंतराळ यानाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येईल. यात सॉफ्ट लॅण्डिंग होणे महत्त्वाचे असेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले. स्पेस डॉकिंग हे अतिशय आव्हानात्मक काम असेल. त्यानंतर यान अंतराळातच जोडले जाईल. अशाप्रकारची मोहीम इस्रो पहिल्यांदाच पार पाडणार असल्याचेही डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानी अंतराळ संघटनेच्या ऑल इंडिया काऊन्सेलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना इस्रो अध्यक्षांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

इस्रोकडे अनेक मोहिमा

चांद्रयान-3 नंतर इस्रोकडे अनेक अंतराळ मोहिमा असल्याचे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले. याआधी इस्रोच्या अधिकाऱ्यांनी चांद्रयान-4 ही मोहीम 2028 मध्ये सुरू करण्यात येईल असे म्हटले होते, परंतु आता इस्रोप्रमुखांनीच लवकरात लवकर पुढील चांद्रयान मोहिमा सुरू करण्यात येतील. कारण चांद्रयान-4 आणि 5 चे डिझाईन तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, इन्सॅट 4 डी वेदर सॅटेलाइट, रिसोर्ससॅट, कार्टोसॅट सॅटेलाईट अशाप्रकरचे तब्बल 70 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;