फडणवीसांनी अधिकार नसताना मराठा आरक्षण दिले, पृथ्वीराज चव्हाण आंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेतली

फडणवीसांनी अधिकार नसताना मराठा आरक्षण दिले, पृथ्वीराज चव्हाण आंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेतली

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला. अधिकार नसताना देण्यात आलेले हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी आंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आंतरवालीत मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आले होते. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला. राज्य सरकारला अधिकार नसताना करण्यात आलेला हा कायदा कुचकामी असल्यामुळे तो न्यायालयात टिकला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार रजनी पाटील या होत्या.

मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;