झेड प्लस सुरक्षेवरून शरद पवारांची टिप्पणी, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून केंद्र सरकारने पवारांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. यामुळे आता सीआरपीएफकडे पवार यांच्या सुरक्षेची धुरा असणार आहे. त्याबाबत बोलताना शरद पवार यांनी ‘माझ्या दौऱ्याची खबरबात घेण्यासाठीच झेड प्लस सुरक्षा दिली असेल’, अशी टिपण्णी केली आहे.
शरद पवार यांच्या सुरक्षेत आजपासूनच वाढ करण्यात आली असून दहा कमांडो शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी बेलार्ड पीयर येथील कार्यालयात आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना झेड प्लस सुरक्षेबाबत अवगत केले. दरम्यान, झेड प्लस ही देशातील सुरक्षेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List