मुकेश अंबानी किती रोमँटिक आहेत? नीता अंबानी म्हणाल्या, ते..
देशातील एक मोठं पॉवरफुल्ल आणि अत्यंत मेहनती कपल म्हणून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे पाहिलं जातं. दोघांची बॉन्डिंग अत्यंत जबरदस्त आहेत. दोघेही उद्योग क्षेत्रात नव्या गोष्टी लॉन्च करतानाच सामाजिक कार्यातही तेवढ्याच हिरहिरीने भाग घेतात. कौटुंबिक सोहळ्यात तर या दोघांमधील बॉन्डिंग अधिकच अधोरेखित होतं. मुकेश अंबानी यांचं कुटुंब अत्यंत छोंट आहे. तीन मुलं, नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मुलाचं अनंत यांचं नुकतंच लग्न झालं. या लग्न सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. या शतकातील सर्वात मोठ्या विवाह सोहळ्याला जस्टिन बीबरपासून त किम कार्दशियन आले होते. हॉलिवूडची मांदियाळी होती. तर अख्खं बॉलिवूड आलं होतं.
आपल्या लाडक्या मुलाच्या लग्न सोहळ्यात मुकेश आणि नीता अंबानी यांनी चांगलाच एन्जॉय केला. या दोघांनीही हिंदी गाण्यावर परफॉर्म करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. मुकेश अंबानी यांचं हे अनोखं रुप पाहून सर्वच चाट पडले. सतत उद्योग क्षेत्रात रमणारे मुकेश अंबानी इतके रोमँटिक असतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मुकेश अंबानी यांच्या गाण्याची चॉईसही अत्यंत अप्रतिम होती. ही गाणी ऐकून तर अनेकांना बॉलिवूडच्या सुवर्णकाळात गेल्याचा भास झाला.
मुकेश अंबानी यांच्या या अनोख्या रुपामुळे त्यांच्या रोमांटिकपणाची चर्चा सुरू झाली आहे. अबू जानी खोसला आणि संदीपा खोसला यांना नीता अंबानी यांनी मुलाखत दिली. यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याची त्यांनी आपल्या खास अंदाजात उत्तर दिले. मुकेश अंबांनी यांचं रोमांटिक असण्याचं सिक्रेटही सांगितलं. या मुलाखतीत नीता अंबानी यांचा बॉस लेडी उल्लेख करण्यात आला. त्याला त्यांनी हसून दाद दिली.
मुलाखतीतील प्रश्नोत्तरे असे…
प्रश्न – भांडण कोण सुरू करतं?
नीता अंबानी – मी.
प्रश्न – सर्वात आधी शांत कोण होतं?
नीता अंबानी – मी.
प्रश्न – घराचा इंटिरियर डेकोरेटर कोण आहे?
नीता अंबानी – मी.
प्रश्न- पाहुण्यांची यादी कोण तयार करतं?
नीता अंबानी – मुकेश अंबानी तयार करतात.
प्रश्न – कुणाला लवकर राग येतो.
नीता अंबानी – कुणालाच नाही.
प्रश्न – तुमच्या दोघांमध्ये सर्वाधिक रोमँटिक कोण आहे?
नीता अंबानी – मुकेश अंबानी.
प्रश्न – घरातील शेवटचा निर्णय कुणाचा असतो?
या प्रश्नाचं उत्तर देताना नीता अंबानी यांनी मुकेश अंबानी यांचं नाव घेतलं. त्यावर मुलाखतकार हसतात. आमचा विश्वास बसत नाही. घरातील सर्व निर्णय तर तुम्हीच घेता, असं मुलाखतकार म्हणतात. त्यावर तुम्ही हवं तर आमच्या मुलांना विचारा, मुकेश हेच अंतिम निर्णय घेतात, असं नीता सांगतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List