अनिल कपूर यांनी थेट ‘या’ अभिनेत्रीला पाजली दारू, हैराण करणारा खुलासा, पुढे जे घडले ते अत्यंत…
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनिल कपूर यांची मोठी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे अनिल कपूर हे सोशल मीडियावर कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर हिने देखील बॉलिवूडमध्ये धमाका केलाय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अनिल कपूर यांचा काही दिवसांपूर्वीच फायटर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे अनिल कपूर यांचा फायटर हा चित्रपट धमाका करताना दिसला.
अनिल कपूर हे आपल्या चित्रपटांचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही करताना कायमच दिसतात. अनिल कपूर यांनी एका शोमध्ये एका अभिनेत्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. अनिल कपूर यांनी अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत 1942: A Love Story या चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम देखील मिळाले.
मनीषा कोईराला हिच्यासोबत काम करण्याच्या अगोदरच अनिल कपूर हे बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक होते आणि त्यांनी अनेक हीट चित्रपट देखील दिले होते. मात्र, दुसरीकडे मनीषा ही चित्रपट क्षेत्रात तशी नवीनच होती. अनिल कपूर आणि मनीषा कोईराला हे ‘रिम झिम रिम झिम’ या गाण्याची शूटिंग करत होते.
गाण्याच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. अनिल कपूर म्हणाले की, गाण्याच्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईराला हिला खूप जास्त थंडी वाजत होती. त्यावेळी मी जॅकेट आणि टोपी घातली होती. परंतू, मनीषा ही फक्त साडीमध्येच होती. मग तिची थंडी कमी करण्यासाठी मी तिला ब्रँडी पिऊ (दारू) घातली.
अनिल कपूर हे पुढे म्हणाले की, मी तिला अगोदर एक पॅक दिला. नंतर दुसरा आणि तिसरा मात्र, तरीही तिला काहीच होत नव्हते आणि थंडी वाजत होती. मग मी तिला चौथा पॅक दिला. यानंतर आमच्या गाण्याचे शूटिंग सुरू झाले, मी ज्यावेळी मागे वळून बघितले, त्यावेळी ती तिथे नव्हतीच. ती चक्क खाली पडली होती. या प्रकारानंतर सर्वचजण हसत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List