Jalna News – वाडी बुद्रुक येथील तिघा तरुणांना कारने चिरडले, दोघे ठार तर अन्य एक गंभीर जखमी

Jalna News – वाडी बुद्रुक येथील तिघा तरुणांना कारने चिरडले, दोघे ठार तर अन्य एक गंभीर जखमी

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा रोडवरील वाडी गणपती मंदिराजवळ भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना चिरडल्याची घटना आज 22 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. शंकर सिताराम चोरमारे (24), ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे (28) असे मृतांचे नावे आहेत तर लक्ष्मण चव्हाण हे गंभीर जखमी आहेत.

गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शंकर सिताराम चोरमारे, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि लक्ष्मण चव्हाण हे तिघे जण भोकरदन आन्वा रोडवर वाडी शिवारातील घरासमोर बसले होते. याच दरम्यान आन्वा गावाकडून भोकरदनकडे भरधाव वेगाने आलेल्या कारने घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली. गाडीने जवळपास 100 फुट त्यांना फरफटत नेले. या भीषण अपघातात शंकर चोरमारे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले जयकुमार शरद देशभ्रतार असे गाडी चालकाचे नाव आहे. कार जळगाव येथून लातूरकडे दोघांना घेऊन मधल्या मार्गे जात होती. अपघातानंतर कार चालकाने कार जागेवर उभी केली. सध्या चालक पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;