Nagar News – बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली तंबी

Nagar News – बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली तंबी

बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वच शाळांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सर्व जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यादृष्टीने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती स्थापन करून त्याचा अहवाल तातडीने पाठवण्याच्या सूचना शिक्षणाधिकार्‍यांनी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटनेनंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे इतर शाळांतही मुले सुरक्षित आहेत का? याचा आढावा तातडीने शासनाकडून घेण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाने, संचालकांना व तेथून प्रत्येक शिक्षणाधिकार्‍यांकडून हा अहवाल तातडीने मागवला आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी 20 ऑगस्ट रोजी सर्व व्यवस्थापन शाळांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना पत्र देत, प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व सखी सावित्री समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तीन बाबी शाळेत कार्यान्वित करून पूर्तता अहवाल गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांना तत्काळ सादर करावा. त्याची एक प्रत या कार्यालयाला सादर करावी. आठ दिवसांत या तिन्ही गोष्टींची पूर्तता केली नाही, तर कडक कारवाईच्या सूचना शासनाने दिलेल्या असून तसे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्येक वर्गखोली व शाळेचा परिसर यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असावा. त्याचे नियंत्रण मुख्याध्यापक कार्यालयातून असावे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणा 24 तास कार्यान्वित ठेवावी. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक खोलीबाहेर तक्रार पेटी असावी. ती आठवड्यातून विशिष्ट वार निश्चित करून खोलावी. तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती यांनी तक्रारींची दखल घेऊन त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. तक्रार पेटी उघडते वेळी महिला सदस्य असणे आवश्यक राहील. शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत सखी-सावित्री समिती स्थापन करावी. शासन निर्णयात अंतर्भूत तरतुदी समितीच्या, पालकांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. शासन निर्णयाचे पालक, शिक्षक बैठकीत प्रकट वाचन करावे. विहित मुदतीत बैठका घ्याव्यात. कोणत्याही कारणास्तव बैठकांमध्ये जास्त खंड पडू देऊ नये.

शाळा स्तरावर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद ठेवला पाहिजे. विविध समितीतील समाविष्ट सर्व घटकांनी यामध्ये वेळ देऊन गांभीर्याने चर्चेत सहभागी झाले पाहिजे. शाळेच्या वर्ग परिसरात बाहेरील लोकांना विनाकारण प्रवेश देऊ नये. जेव्हा बाह्य लोकांना प्रवेश दिला जातो त्यावेळी त्यांच्यासोबत जबाबदार व्यक्ती ठेवावी. मुलांच्या सुरक्षेत तडजोड केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग यांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;