Badlapur Sexual Assault – जालन्यात महिला काँग्रेसचे राज्य सरकारविरोधात मटका फोडो आंदोलन

Badlapur Sexual Assault – जालन्यात महिला काँग्रेसचे राज्य सरकारविरोधात मटका फोडो आंदोलन

जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील गांधी चमन येथे आज 22 ऑगस्ट गुरुवार रोजी राज्य सरकारविरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी नाकर्त्या सरकारच्या विरोधात महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी प्रचंड घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. बदलापूरमध्ये दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याने पालकांनी तीव्र आंदोलन केले. मात्र या आंदोलकांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला शिवाय हे आंदोलन राजकीय पुरस्कृत असल्याचेही नाकर्त्या सरकारने म्हटले होते. त्यामुळे राज्य सरकारविरोधात शहरातील गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने मटका फोडो आंदोलन करण्यात आले आहे. यासह गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.. असं म्हणत नराधमाच्या फाशीचीही मागणी यावेळी आंदोलक महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, तालुकाध्यक्षा इंदूबाई मैद,नंदा सांडू रगडे, अर्चना राऊत, रमा राठोड, मंदा विठ्ठल कांबळे,पद्मा भगवान रगडे,सुनिता ताराचंद पिपळे,आरती ज्ञानेश्वर कांबळे,ज्योती गजानन कांबळे,खैरूनिसा सय्यद,विभा लांखे, रूख्मन नाना कांबळे,उज्ज्वला कचरु मगरे,दिक्षा विजय रगडे,गुफा भिमराव रगडे,विमल देवीदास म्हस्के,लक्ष्मी तात्याराव कांबळे,वंदना बाबासाहेब रगडे,ताई राजू पवार,रेखा देवसिंग पवार,विमल लक्ष्मण धोत्रे यांच्यासह अधिपदाधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी यात सहभाग घेतला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;