दोन महिन्यात तिसऱ्या हनिमूनवर सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बालसोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, अखेर…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसले. लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्न करणार असल्याचे समजताच सिन्हा कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मुलीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा हे धमाल करताना दिसले. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश हे लग्नापासून दूर होते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी तब्बल सात वर्ष डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची पहिली भेट ही सलमान खान याच्या घरी झाली. सोनाक्षी सिन्हा ही लग्न झाल्यापासून सतत विदेशात धमाल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे लग्न होऊन दोन महिने झाले असताना सोनाक्षी सिन्हा ही आता झहीर इक्बाल याच्यासोबत तिसऱ्यांदा हनिमूनवर गेलीये.
नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबतच अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी झहीर इक्बाल याच्यासोबत रोमांटिक होतानाही सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे विदेशात खास वेळ घालवताना दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा ही सतत आपल्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे कायमच सोनाक्षी सिन्हा हिचे हे चित्रपट धमाल करताना दिसतात.
सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत अगोदर सिव्हिल मॅरेज केले. त्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रात्री एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार देखील पोहोचले होते. या पार्टीत सर्वजण धमाल करताना दिसले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List