सोशल मीडिया स्टारला प्रभासच्या चित्रपटाची मोठी ऑफर; रसिका सुनीलच्या पतीसोबतही केला होता डान्स
सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाल्याची उदाहरणं पाहिलीच असतील. याच सोशल मीडियामुळे एका डान्सरला थेट 'बाहुबली' स्टार प्रभाससोबत चित्रपट करण्याची मोठी संधी मिळाली आहे. इमान्वी असं तिचं नाव असून प्रभाससोबतच्या चित्रपटातून ती अभिनयक्षेत्रात पदार्पण करतेय.
'सीता रामम'चे दिग्दर्शक हानू राघवपुडी यांनीच इमान्वीची निवड केली आहे. 'फौजी' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून इमान्वीच्या फॉलोअर्समध्ये आणखी वाढ होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हानू यांनी इमान्वीच्या निवडीबद्दल सांगितलं आहे.
नवीन प्रतिभा शोधण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम आणि सर्वांत सोपं साधन आहे. योग्य प्रतिभेपर्यंत कसं पोहोचायचं हे इंडस्ट्रीतल्या अनेकांना कळत नाही. पण सोशल मीडियाची यात नक्कीच मोठी मदत होते. इमान्वी दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच ती प्रतिभावान आहे", असं ते म्हणाले.
इमान्वीच्या निवडीविषयी त्यांनी पुढे सांगितलं, "अनेकांप्रमाणे मीसुद्धा तिच्या डान्सचे व्हिडीओ पाहिले होते. ती उत्तम भरतनाट्यम नृत्यांगणा आहे. पण या सर्वांत तिचे डोळे अत्यंत सुंदर आहेत. तिच्या डोळ्यांतून अनेक भावभावना सहज व्यक्त होतात. म्हणून तिला संधी देण्याचा विचार केला. अर्थात हा निर्णय फक्त माझाच नव्हता, त्यात टीमचाही समावेश होता."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List