विकृत पुरुषांना जगण्याचा अधिकार…; बदलापूर अत्याचार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकरची संतप्त पोस्ट

विकृत पुरुषांना जगण्याचा अधिकार…; बदलापूर अत्याचार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकरची संतप्त पोस्ट

कोलकात्यातील डॉक्टर तरूणीवरील अन्यायाची घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. साडे चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. शाळेतील शौचालयातील सफाई कामगाराने या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. कलाक्षेत्रातूनही या घटनेचा निषेध केला जात आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ काय म्हणाला?

बदलापूरमधील चिमुकल्यांच्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने याबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केलीय. आता बोला की मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे, म्हणजे कुणी तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही… त्या लहान पोरींना तर संस्कृती या शब्दाचा अर्थही माहीत नसेल. स्कूल युनिफॉर्ममधल्या 3- 4 वर्षांच्या मुली आहेत त्या! या चिमुकल्या जीवांवर अत्याचार करणं ही विकृती आहे. या विकृत पुरुषांना ‘मानवी हक्क’ नसावेत! कसलाही अधिकार नसावा! जगण्याचाही!, अशी पोस्ट सिद्धार्थने इन्टाग्रामवर शेअर केलीय.

Siddharth Chandekar post

बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

बदलापूर इथल्या आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शौचालयातील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे स्थानिक लोक आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. बदलापूर रेल्वे 11 तास झालेल्या रेलरोकोने महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेतलं. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.

कोलकात्यातील बलात्कार प्रकरणावरही सिद्धार्थ चांदेकरने एक व्हीडिओ शेअर केला होता. यात त्याने मुलांवर संस्कारांची गरज असल्याचं म्हटलं होतं. मला वाटतं ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’हे आपण आता बोलायला नको. मुलगी शिकतेय, तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये. आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येतेय की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची, कोणाशी बोलतोय, काय विचार आहेत त्याचे.. हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली, असं सिद्धार्थ म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;