अमिताभ बच्चन म्हणाले हृदय तुटले, जया यांना अश्रू रोखणे कठीण, अखेर डोळे पुसत म्हणाल्या, वेळ हा…
बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरू असल्याच्या तूफान चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवत अनेक हीट चित्रपट ही बॉलिवूडला दिली आहेत. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे रिलेशन कायमच जावेद अख्तर आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यासोबत खास राहिले आहे. अमिताभ बच्चन आणि जया यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यासोबत काम केले. अमिताभ बच्चन यांचा जंजीर चित्रपट हीट ठरल्यानंतरच जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले.
ज्यावेळी जावेद आणि सलीम यांची जोडी तुटली त्यावेळी अनेक लोक निराश झाले. सलीम-़ जावेद यांची डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ वेळी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मान्य केले की, ज्यावेळी या दोघांची जोडी तुटली त्यावेळी आपण निराश झालो होतो. अमिताभ बच्चन हे म्हणाले की, हे दोघे वेगळे झाल्यानंतर मी खूप जास्त त्रस्त होतो.
पण सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यासोबत वेगवेगळे काम करण्याची संधी मिळाली. परंतू दोघे जेंव्हा एकत्र होते, तेंव्हा सर्वकाही एक वेगळेच होते. सलीम आणि जावेद यांच्या स्क्रीप्टबद्दल बोलताना जया बच्चन या चांगल्याच भावूक झाल्या. हेच नाही तर जया बच्चन यावेळी आपले अश्रू लपवताना देखील दिसल्या. डोळे पुसत पुसत जया बच्चन म्हणाल्या की, तो वेळ खरोखरच खूप खास होता.
कमी वेळ होता, पण शानदार होता. जया बच्चन पुढे म्हणाल्या, आयुष्यात तुमच्याकडे ज्याकाही गोष्टी आहेत त्यापैकी काही गोष्टी तुमच्याकडे अगदी कमी वेळासाठी असतात. त्या गोष्टी आपण कायमच जपायला हव्या, असेही जया बच्चन यांनी म्हटले आहे. आता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय.
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. आता अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हेच नाही तर अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List