दुसऱ्या लग्नाच्या 5 महिन्यांनंतर अभिनेता हनिमूनवर; सलमानच्या बहिणीला दिला होता घटस्फोट
अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी मार्च 2024 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर हे दोघं हनिमूनला गेले आहेत. पुलकित आणि क्रितीने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन समुद्रकिनारी चालताना दिसत आहेत.
'आयुष्यातील प्रत्येक चांगल्या-वाईट काळात नेहमीच तुझी साथ राहील', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. पुलकितचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी पहिलं लग्न केलं होतं.
लग्नाच्या वर्षभरातच श्वेता आणि पुलकित यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या आणि अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. श्वेता ही सलमानची मानलेली बहीण असून दरवर्षी ती न चुकता त्याला राखी बांधते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List