ऐश्वर्या रायच्या घरी जेव्हा एक्स बॉयफ्रेंडने पाठवले होते 30 गिफ्ट, त्या दिवशी काय घडलं होतं?

ऐश्वर्या रायच्या घरी जेव्हा एक्स बॉयफ्रेंडने पाठवले होते 30 गिफ्ट, त्या दिवशी काय घडलं होतं?

ऐश्वर्या राय ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच. पण ती अमिताभ बच्चन यांची सून देखील आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा आहे. दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. ऐश्वर्या सध्या फक्त तिच्या मुलीसोबतच वेगवेगळ्या फंक्शनमध्ये दिसतेय. त्यामुळे ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्य हे दोघेही बच्चन कुटुंबासोबत राहत नसून वेगळ्या राहत असल्याची देखील इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. नुकताच झालेल्या अनंत अंबानीच्या विवाह प्रंसगी देखील ऐश्वर्या आपली मुलगी आराध्य सोबत एकीकडे दिसली होती. तर दुसरीकडे संपूर्ण बच्चन कुटुंब होतं. अभिषेक सोबत विवाह होण्याआथी ऐश्वार्या रायचं नाव अनेक बॉलिवूड स्टार सोबत जोडण्यात आलं.

ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत

आता अभिषेक बच्चनसोबत तिचा घटस्फोटाच्या बातम्यांमुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण याआधी ऐश्वर्या राय तिच्या अफेअर्समुळे खूप चर्चेत असायची. अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या रायच्या आयुष्यात अनेक लोक आले आणि गेले. या यादीत सलमान खानपासून विवेक ओबेरॉयपर्यंत या नावांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का की विवेक ओबेरॉयचे ऐश्वर्या रायवर खूप प्रेम होते. तो तिच्यासाठी पूर्णपणे वेडा झाला होता असं ही बोललं जातं.

फार कमी लोकांना माहित आहे की विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायला तिच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त 30 भेटवस्तू दिल्या होत्या. या भेटवस्तूंशिवाय त्याने ऐश्वर्या रायला पाळीव कुत्राही भेट म्हणून दिला होता. ज्याचे सनशाईन असे नाव ठेवण्यात आले होते. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं.

विवेक-ऐश्वार्याचे का झाले होते ब्रेकअप

विवेक ओबेरॉय याने एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये सलमान खान आपल्याला त्रास देत असल्याचं त्याने म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतरच विवेक ओबेरॉय आणि ऐश्वार्याचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं. कारण ऐश्वर्या रायला विवेक ओबेरॉयची ही कृती खूपच बालिश वाटली होती. ज्यामुळे तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याआधी ऐश्वर्या राय सलमान खानला डेट करत होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;