Salman-Aishwarya : या अभिनेत्रीमुळे सलमान-ऐश्वर्याचं झालं होतं ब्रेकअप? लीक झाली होती टेप

Salman-Aishwarya : या अभिनेत्रीमुळे सलमान-ऐश्वर्याचं झालं होतं ब्रेकअप? लीक झाली होती टेप

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं कायमच चर्चेत राहिले आहे. दोघांनी कधीही त्याला दुजोरा दिला नाही पण त्यांनी कधी नातं नाकारलं देखील नाही. आजही दोघांचं नात गॉसिप्सचा चर्चेचा विषय ठरतो. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण हे नाते जास्त दिवस चालू शकले नाही. दोघेही वेगळे झाले. पुढे ऐश्वर्याचं नाव विवेक ऑबेरॉय सोबत जोडलं गेलं. पण तेही टिकलं नाही. नंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. पण आता दोघांमध्ये ही काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबियांसोबत राहत नसल्याचं समोर आले आहे.

ऐश्वर्याचे सलमानवर आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याने सलमानवर आरोप केले होते. ज्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. ऐश्वर्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना सलमानने प्रिती झिंटाची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला होता. सलमान खानचा फोन टॅप करण्यात आला आणि ऐश्वर्या रायसोबतच्या संभाषणाची टेप टीव्ही चॅनल्सवर प्रसिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला.

कथित टेप लीक

‘हिंदुस्तान टाइम्स’ने टेपची एक प्रत शेअर केली होती. 28 ऑगस्ट 2001 रोजी सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील संभाषण असल्याचे म्हटले होते. कथित संभाषणात सलमानने ऐश्वर्याला शिवीगाळ केली होती आणि ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान प्रिती झिंटासोबतच्या संबंधांबद्दलही सांगितले होते. या टेपमध्ये छेडछाड करण्यात आली होती आणि ती खोटी असल्याचे फॉरेन्सिकद्वारे नंतर उघड झाले होते.

कथित लीक झालेल्या टेपने मीडियामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली होती. संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला होता. इतकंच नाही तर लीक झालेल्या टेपनंतर बिझनेसमन नेस वाडियासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रीतीने त्याच्यासोबतचे नाते वाईट पद्धतीने संपवले होते. नंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रितीने सलमानसोबतच्या तिच्या नात्याच्या अफवांवर भाष्य केले होते. ती म्हणाली होती की, “सलमान माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याला बऱ्याच काळापासून ओळखते आणि आम्ही नेहमीच एकमेकांसाठी उपलब्ध असतो, परंतु आमच्यात मैत्रीपेक्षा अधिक कधीच काही नव्हते.”

प्रीती झिंटा अमेरिकेत स्थायिक

प्रीती झिंटाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2016 मध्ये जीन सोबत विवाह केला होता. आता दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. प्रीती आणि जीन यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांचे जय आणि जियाचे स्वागत केले. अभिनेत्री कामानिमित्त भारतात येत असते.

Preity Zinta: इस मंदिर से है प्रीति ज़िंटा के बचपन का खास कनेक्शन, पति और  बेटे के साथ दर्शन करने पहुंची | Preity Zinta Himachal Hateshwari Mata  Temple Hatkoti Visit With Husband

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने सलमानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे प्रतिक्रिया दिली होती. ऐश्वर्या म्हणाली होती की, “सलमान ब्रेकअप स्वीकारू शकला नाही. आमच्या ब्रेकअपनंतर तो मला फोन करायचा आणि वाईट पद्धतीने बोलायचा. माझे सहकलाकारांसोबत अफेअर असल्याचाही त्याला संशय होता. अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत सर्वांशी माझे नाव जोडले गेले. अनेकवेळा सलमानने माझ्यासोबत हिंसाचाराचा वापर केला, पण सुदैवाने त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;