बॉबी देओल याचे दोन्ही मुले करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण, अभिनेता म्हणाला, इतरांपेक्षा त्यांच्यावर…

बॉबी देओल याचे दोन्ही मुले करणार बॉलिवूडमध्ये पर्दापण, अभिनेता म्हणाला, इतरांपेक्षा त्यांच्यावर…

देओल कुटुंबाचा बॉलिवूडमध्ये एक वेगळाच दबदबा हा बघायला मिळतो. हेच नाही तर सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील धमाका करताना दिसतात. धर्मेंद्र यांनीही मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्स मोठ्या प्रमाणात पर्दापण करताना दिसत आहेत. हेच नाही तर एकाच बॉलिवूड चित्रपटामध्ये तब्बल तीन स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सनी देओल याच्या लेकानेही बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मात्र, त्याच्या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. आता बॉबी देओलच्या लेकांबद्दल मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहे.

बॉबी देओल याने एक मुलाखत दिलीये. आता बॉबी देओलची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. या मुलाखतीमध्ये बॉबी देओल याच्याकडून काही मोठे खुलासे हे करण्यात आले. बॉबी देओल याने म्हटले की, माझ्या दोन्ही मुलांना अभिनय क्षेत्रामध्ये यायचे आहे. बॉबी देओलच्या एका मुलाचे नाव आर्यमन आणि दुसऱ्या मुलाचे नाव धरम आहे.

दोघांनाही फक्त अभिनय क्षेत्रामध्येच करिअर करायचे आहे. मी दोघांसोबत बॉलिवूड क्षेत्राबद्दल आणि येथे असलेल्या चॅलेजबद्दल कायमच बोलतो. मी नेहमीच लक्ष ठेवले आहे की, ते दोघे आपल्या सर्व गोष्टींसोबत जोडलेले असावेत. माझे दोन्ही मुले हे हिंदीमध्येच बोलतात. हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे तर हिंदी येणेही आवश्यक आहे.

पुढे बॉबी देओल याने स्पष्ट केले की, असे अजिबात नाही की, तुम्ही फिल्मी कुटुंबातून आला म्हणजे तुम्हाला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागणार नाही आणि लगेचच यश मिळेल. मी त्यांचा वडील असल्याने काहीही फरक पडत नाही. मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो. पण इथे संघर्ष त्यांनाच करावा लागणार आहे. विषय फक्त याच क्षेत्रामधील नाही तर कुठेही गेले तरीही त्यांना त्यांचा संघर्ष हा करावा लागेल.

प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आव्हान मिळणार आहेत. चित्रपट क्षेत्रामध्ये टिकणे खूप अवघड असल्याचे सांगतानाही बॉबी देओल हा दिसलाय. हे तर नक्कीच आहे की, फिल्मी कुटुंबातून असल्याने माझ्या मुलांवर लोकांची अधिक नजर असणार आहे. पण त्यांना मेहनत करावी लागेल. त्यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्या बॉबी देओलचे दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;