प्रियांका चोप्राकडून आगामी मराठी सिनेमाची घोषणा; ‘पाणी’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रियांका चोप्राकडून आगामी मराठी सिनेमाची घोषणा; ‘पाणी’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 18 ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे दिग्दर्शनात पदार्पण करत असून राजश्री एंटरटेन्मेंटसारखा मोठा बॅनर, इंटरनॅशनल आयकॉन अशी ख्याती असणारी प्रियांका चोप्रा आणि महाराष्ट्राची शान असलेले कोठारे व्हिजन प्रा. लि.असे तिन्ही मोठे निर्माते एकत्र येत आहेत. या तिघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीला एक सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुभवायला मिळणार आहे.

सिनेमात कोण- कोण कलाकार?

नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या ‘पाणी’मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

प्रियांका या सिनेमाबाबत काय म्हणाली?

‘पाणी’या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा हिने प्रतिक्रिया दिली आहे.’पाणी’ हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी घेऊन येताना खूप आनंद होतोय. एक असा उत्कट प्रकल्प जो अतिशय महत्वाचा मुद्दा हाताळणार आहे, असं प्रियांका चोप्रा म्हणाली.

‘पाणी’ हा चित्रपट खूप खास आहे. निर्मितीसाठी आव्हानात्मक असला तरी आपण ज्या काळात राहात आहोत, त्या काळासाठी तो खूप प्रासंगिक आहे. हा एका अशा माणसाचा प्रवास आहे, ज्याने आपल्या आजुबाजुच्या सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल घडवला. हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आदिनाथचं दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय आहे. या संपूर्ण टीमचे, त्यांच्या मेहनतीचे मनापासून आभार. माझा चौथा मराठी चित्रपट मी राजश्री एंटरटेनमेंट आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासारख्या दोन बलशाली संस्थेसोबत घेऊन येत आहे. याचा मला आनंद आहे, असंही प्रियांका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

‘पाणी’ सिनेमाचा दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यानेही या सिनेमाबाबत त्याचं मत मांडलं आहे. प्रियांका चोप्रा, राजश्री एंटरटेन्मेंट यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक मोठी संधी होती. माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या चित्रपटाला अशी टीम लाभणे, हे मी माझे भाग्य समजतो. ‘पाणी’ लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांसोबत राहील, असं आदिनाथ कोठारे म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;