जेव्हा ऐश्वर्या रायने सांगितले की, तिचा आणि अभिषेक बच्चनचा वाद का झाला

जेव्हा ऐश्वर्या रायने सांगितले की, तिचा आणि अभिषेक बच्चनचा वाद का झाला

बॉलीवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेली ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे वेगळे पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना घटस्फोटा संदर्भातील सोशल मीडिया पोस्ट अभिषेकने लाईक केल्याने खळबळ आणखी वाढलीये. दरम्यान, ऐश्वर्या रायची जुनी मुलाखत पुन्हा समोर आली आहे, जी त्यांच्या नात्याची एक दुर्मिळ आणि स्पष्ट झलक देतेय.

‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने म्हटले होते, तिने सांगितले होते की, तिच्या आणि अभिषेकमध्ये अनेकदा मतभेद होतात. सुरुवातीला सांगताना ती  कचरत होती. पण नंतर ऐश्वर्याने सांगितले होते की, त्यांच्यातील वाद ही खाजगी बाब आहे. “हे कोणालाच जाणून घ्यायचे नाही.” पण जसजसे संभाषण पुढे सरकत गेले, तसतसे त्यांनी मजबूत, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेले जोडपे म्हणून त्यांना येणाऱ्या आव्हानांबद्दल खुलासा केला.

ऐश्वर्या म्हणाली की, “आम्ही अजूनही वादविवाद आणि चर्चा यातील फरक शिकत आहोत, त्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या वादविवाद आणि चर्चा यांच्यात एक चांगली रेघ काय आहे हे अजूनही शोधत आहोत म्हणून आम्ही खूप चर्चा करतो.”

2007 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर यासाठी ओळखले जाते. प्रत्येक नात्याप्रमाणेच त्यांच्यात वाद आणि मतभेदाचे क्षण येतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिषेक बच्चन पुढे शाहरुख खान स्टारर ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, ऐश्वर्या राय बच्चन शेवटची ‘पोनियिन सेल्वन: II’ मध्ये दिसली होती.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्याबाबत अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरुच आहे. ऐश्वर्या राय आता बच्चन कुटुंबियांसोबत राहत नाही. दोघांमध्ये नेमका दुरावा का निर्माण झालाय याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहे. पण खरे कारण अजून ही समोर आलेले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;