Urvashi Rautela ची प्रकृती चिंताजनक? रुग्णालयात दाखल अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट

Urvashi Rautela ची प्रकृती चिंताजनक? रुग्णालयात दाखल अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट

अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री रुग्णालयात दाखल झाल्याचं दिसून येत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे काही चाहत्यांनी उर्वशीचं समर्थन केलं आहे, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्वशी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. उर्वशी हिने 21 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर एका फोटो पोस्ट केला आहे.

उर्वशी हिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री रुग्णालयातील सोफ्यावर बसल्याचं चित्र दिसून येत आहे. यावर उर्वशी किंवा तिच्या टीमने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण अभिनेत्रीने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उर्वशी हिने रुग्णालयातील फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘माझ्यासाठी प्रार्थना करा…’ असं लिहिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

 

फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी उर्वशी हिला ट्रोल केलं आहे. काहींनी तर फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी असं करते असं म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या फोटो कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ओव्ह ऍक्टिंग की दुकान…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अशा लहान गोष्टींकडं आम्ही लक्ष देखील देत नाही.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘फक्त नाटक करते…’ सांगायचं झालं तर अभिनेत्रीच्या हाताला जखम झाल्याची माहिती समोर येत आहे.

जुलै 2024 मध्ये, उर्वशी रौतेलाला फ्रॅक्चरमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती हैदराबादमध्ये नंदामुरी बालकृष्णा यांच्या आगामी तेलुगू सिनेमा ‘NBK 109’ साठी शूटिंग करत होती. मात्र, एका ॲक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान ती जखमी झाली. तेव्हापासून अभिनेत्रीला वेदना होत आहेत.. असं उर्वशीच्या टिमने सांगितलं होतं.

उर्वशी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. ‘सिंह साब द ग्रेट’, ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’ आणि ‘पागलपंती’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्री दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

उर्वशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील उर्वशीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;