‘हात लावू नका..’; चाहतीच्या त्या कृतीवर भडकल्या हेमा मालिनी, व्हिडीओ व्हायरल

‘हात लावू नका..’; चाहतीच्या त्या कृतीवर भडकल्या हेमा मालिनी, व्हिडीओ व्हायरल

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत एक फोटो किंवा सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. जेव्हा ही संधी त्यांना प्रत्यक्षात मिळते, तेव्हा मात्र काही चाहते मर्यादा ओलांडताना दिसतात. असंच काहीसं ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्यासोबत घडलंय. हेमा मालिनी यांनी नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काही लोकांसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते. या कार्यक्रमातील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहती हेमा मालिनी यांच्यासोबत फोटो काढताना त्यांच्या पाठी हात टाकताना दिसत आहे. याला हेमा मालिनी यांनी विरोध केला आणि त्यांनी हात बाजूला करण्यास सांगितलं.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी यांच्या एका बाजूला गायक अनुप जलोटा आणि दुसऱ्या बाजूला एक महिला उभी आहे. कॅमेरासमोर जेव्हा हे तिघं फोटोसाठी उभे राहतात, तेव्हा ती महिला हेमा मालिनी यांच्या पाठी हात टाकते. यामुळे त्या लगेच संकोचल्यासारखे होतात आणि त्या महिलेला हात बाजूला काढण्यास सांगतात. यावेळी हेमा मालिनी यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘हेमा मालिनी यांचं काहीच चुकलं नाही. एखाद्याच्या परवानगीशिवाय कोणीच कोणाला स्पर्श करू नये’, असं एकाने लिहिलंय. तर ‘अनोळख्या व्यक्तीने माझ्याही खांद्यावर हात ठेवला, तर मलाही ते आवडणार नाही’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘लोकांनी त्यांच्या मर्यादेत वागलं पाहिजे. दुसऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना स्पर्श करू नये’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ‘जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती स्पर्श करते, तेव्हा चीड येणं स्वाभाविक आहे. पण ती महिला खूपच उत्सुक दिसत आहे. ड्रीम गर्लसोबत फोटो काढण्यासाठी तिने बरीच प्रतीक्षा केली असावी. अखेर तीसुद्धा एक चाहती आहे आणि तिला तिच्या आवडत्या अभिनेत्रीसोबत फक्त फोटो काढायचा आहे’, असंही काहींनी म्हटलंय.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आबे. मथुरा मतदारसंघात त्या सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. काँग्रेसच्या मुकेश धनगर यांचा 2,93,407 मतांनी त्यांनी पराभव केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;