पहिल्या पत्नीसोबत नाते तोडण्याचा जावेद अख्तर यांना मोठा पश्चाताप, म्हणाले, मी तिला…

पहिल्या पत्नीसोबत नाते तोडण्याचा जावेद अख्तर यांना मोठा पश्चाताप, म्हणाले, मी तिला…

जावेद अख्तर यांचे काम आणि त्यांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. जावेद अख्तर आणि सलीम खान डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ प्रदर्शित झालीये. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर खुलासे केले आहेत. हेच नाही तर जावेद अख्तर यांनी आपली पहिली पत्नी हनी इरानीसोबत लग्न तुटल्याचे कारणही सांगितले आहे. हेच नाही तर पहिल्या पत्नीसोबत नाते तुटण्याचे कारणही आपणच असल्याचे जावेद अख्तर यांनी मान्य केले. जावेद अख्तर हे म्हणाले की, या जगात हनी (एक्स पत्नी) ही अशी एकमेंव व्यक्ती आहे की, जिच्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटते आणि तिच्यावरच मी अन्याय केलाय. मला पश्चाताप नक्कीच होतो.

हनीसोबत माझे लग्न 60 ते 70 टक्के तुटण्याचे कारण मीच आहे. जर त्यावेळी जिंदगीबद्दल इतकी समज असती तर जेवढ्या काही गोष्टी बिघडल्या आहेत त्या कधीच बिघडल्या नसत्या. हे मान्य करणे अवघड आहे. मात्र, आयुष्य यालाच म्हणतात. यावेळी जावेद अख्तर यांचा लेक फरहान यानेही मोठा खुलासा केला.

फरहान म्हणाला की, त्यावेळी मी माझ्या वडिलांवर खूप जास्त नाराज होतो. मला वाटत होते की, त्यांनी धोका दिलाय. मी जेंव्हा मोठा होत होतो, त्यावेळी माझ्या मनामध्ये काही गोष्टी सुरू होत्या, एक भावना होती. यावर जावेद अख्तर यांची मुलगी जोया हिने देखील मोठे भाष्य केले. ज्यावेळी हे दोघे विभक्त झाले, त्यावेळी आम्ही आमच्या आईसोबत राहणे बंद केले.

आम्ही त्यांना अजिबातच वेळ देत नव्हतो. दुसरीकडे वडिलांसोबत देखील गोष्टी व्यवस्थित करण्यास आम्हाला बराच वेळ लागला. मला वाटते की, वडिलांसोबतचे नाते ठिक करण्यासाठी शबानाजी यांची मोठी भूमिका राहिली आहे. शबाना यांनीही जावेद यांची दुसरी पत्नी झाल्यानंतर काय घडले हे सांगितले.

शबाना या म्हणाल्या की, जेंव्हा एका नात्यामध्ये तीन व्यक्ती एकत्र येतात, तेंव्हा ते खूप जास्त त्रासदायक असते. लोक थेट म्हणतात की, ही घर तोडणारी आहे. हेच नाही तर शबाना यांनी जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे काैतुक करत म्हटले की, मी काही गोष्टींचे श्रेय हे हनीला देते. कारण ती तिच्या मुलांना माझ्याबद्दल काहीही भडकून देऊ शकत असती, मात्र, तिने तसे केले नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;