फडणवीस, मराठ्यांना फसवल्याची शिक्षा भोगावीच लागेल! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

फडणवीस, मराठ्यांना फसवल्याची शिक्षा भोगावीच लागेल! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस आता राजीनामा देण्याची भाषा करत आहेत. हा पश्चाताप करून घेण्याची वेळ का आली याचा विचार करा. तुम्ही मराठ्यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार, असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केला.

मी मराठा आरक्षणात कुठलाही खोडा घातला नाही. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावे, नसता मी राजीनामा देतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी टीकेचा भडिमार केला. राजीनामा देण्याची भाषा फडणवीस करत आहेत. हा पश्चाताप करून घेण्याची वेळ का आली याचा शोध त्यांनी घेतला पाहिजे. फडणवीसांनी मराठ्यांची फसवणूक केली आहे, असा स्पष्ट आरोप करत जरांगे यांनी त्यांना शिक्षा भोगावीच लागेल असा इशारा दिला.

देवेंद्र फडणवीस यांना पुढचा पश्चाताप टाळायचा असेल तर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घ्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागण्यांचा पुनरुच्चारही मनोज जरांगे यांनी केला. मी मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करत असल्यानेच माझ्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली. आंतरवालीत लाठीहल्ला करणार्‍या जातीयवादी अधिकार्‍यांना बढत्या देण्यात आल्या. आम्हाला राजकारणात उतरण्यासाठी मजबूर करू नका, आम्ही राजकारणात आलो तर तुमचे हाल होतील, असेही मनोज जरांगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;