जम्मू-काश्मीरमध्ये गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, सीआरपीएफचा अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये गस्ती पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला, सीआरपीएफचा अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे. कुलदीप सिंग असे शहीद झालेल्या सीआरपीएफ अधिकाऱ्याचे नाव आहे.

उधमपूर जिल्ह्यातील रामनगरमधील चील भागात सीआरपीएफचे पथक गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कुलदीप सिंग शहीद झाले. गस्ती पथकाकडूनही दहशतवाद्यांना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. यानंतर दहशतवादी पळून गेले. घटनास्थळी अतिरिक्त बळ पाठवण्यात आले असून सर्च ऑपरेशन जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांत जम्मूतील उधमपूर, कठुआ, रियासी, डोडा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत दहशतवाद्यांकडून लष्कर, सुरक्षा दल आणि नागरिकांवर हल्ले सुरू आहेत. अचानक हल्ले करून घनदाट जंगलात गायब होणे ही या दहशतवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे. दहशतवाद्यांच्या या रणनीतीचा मुकाबला करण्यासाठी कठुआ, पुंछ, राजौरी, रियासी, उधमपूर आणि डोडा जिल्ह्यांच्या पर्वतशिखरांवर लष्कर आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;