अंतर्गत वाद चव्हाट्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती तुटणार? राजकीय वर्तुळात चर्चा

अंतर्गत वाद चव्हाट्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती तुटणार? राजकीय वर्तुळात चर्चा

विधानसभा निवडणुकीवर डोळे ठेवत महायुती सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजना आणल्या. या योजनांच्या श्रेयवादावरून महायुतीत चांगलीच जुंपली होती. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अजित पवार यांच्या गटावर फोडण्यात आले होते. आताही महायुती विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा होत आहे. मात्र, अनेक घटनांवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याने विधानसभेपुर्वीच महायुतू तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि श्रेयवादाची लढाई आता चव्हाट्यावर आली आहे. भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यासह या तिन्ही गटातील अंतर्गत वादही उफाळून येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे विधानसभेपूर्वी महायुती तुटण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील जुन्नर तालुक्यात अजित पवार यांना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेने संतप्त झालेल्या आमदार अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांकडे खुलासा मागितला. त्यावर भाजपा आमदार जगदीश मुळीक यांनी खुलासा मागण्याची मिटकरींची लायकी नसल्याचे सांगत त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी मंत्री रवींद्र चव्हाणांवर टीका केली. रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी कदमांनी केली. त्यावर रवींद्र चव्हाणांनीही पलटवार करत रामदास कदम अडाणी माणूस, तोंड सांभाळून बोलावे अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असे प्रत्युत्तर दिले. माझे तोंड फोडायला तुला 100 जन्म घ्यावे लागतील, असे कदमांनी त्यांना सुनावले. यावर रामदास कदमांनी बालिश विधाने करू नये, असे भाजपने म्हटले आहे.तसेच आमची स्वतंत्र्य लढण्याची तयारी आहे, अशी समज देण्यात आली.

रायगड येथील शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार गट विश्वासघात करणारा आहे, हे मी आज जाहीरपणाने सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं, हेच त्यांचं काम आहे. त्यांच्या गटाचे नेतृत्वच विश्वासघातकी असल्याचे महेंद्र थोरवे म्हणाले. महेंद्र थोरवे हे अदखलपात्र आहेत, त्यांना आमचे स्थानिक नेते उत्तर देतील असे प्रत्युत्तर तटकरेंनी दिले.

आठवड्याभरात घडलेल्या अनेक घटनांवरून महायुतीत आलबेल नसल्याचे दिसत आहे. श्रेयवादावरून भाजप, अजित पवार गट, शिंदे गट यांच्यात जुंपली आहे. त्यातच अनेक नेते आता स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर येत असून विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती तुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;