व्हिडीओ पाहून ढसाढसा रडताना दिसला छोटा पुढारी, अखेर बिग बॉसच्या घरात नेमके घडले तरी काय…

व्हिडीओ पाहून ढसाढसा रडताना दिसला छोटा पुढारी, अखेर बिग बॉसच्या घरात नेमके घडले तरी काय…

बिग बॉस मराठी सीजन 5 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये हे सीजन अजून धमाका करेल असेही सांगितले जातंय. विशेष म्हणजे अनेक मोठी नावे या सीजनमध्ये सहभागी झाली आहेत. यासोबतच छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे हा देखील या बिग बॉसमध्ये सहभागी झालाय. छोट्या पुढारीचा अंदाज प्रेक्षकांना आवडताना देखील दिसतोय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात झालेल्या कॅप्टनशी टास्कमध्ये चांगला गेम खेळताना घनश्याम दरोडे दिसला. घनश्याम हा बिग बॉस मराठीमधील सर्वाधिक चर्चेत असलेले एक नाव आहे.

नुकताच रितेश देशमुख याने घरातील काही सदस्यांना व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओच्या माध्यमातून काही घरातील सदस्यांची पोलखोल ही बिग बॉसच्या निर्मात्यांकडून करण्यात आली. यावेळी घनश्याम दरोडे याला देखील एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये पॅडी कांबळे, अंकिता हे घनश्याम याच्याबद्दल बोलताना दिसले.

यावेळी अंकिता हिने तर थेट म्हटले की, मला त्या घनश्यामच्या कानाखाली मारण्याची इच्छा होते. मला त्याला बघितले तरीही प्रचंड राग येतो. यावेळी पॅडी कांबळेने देखील म्हटले की, तो घनश्याम हा लोकांच्या मागे मागे फिरतो आणि त्यांची सर्व कामे करतो, हे सर्व घनश्याम याला व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले.

यानंतर त्याने अंकिता, पॅडी आणि घरातील काही सदस्यांना खडेबोल सुनावले. रितेश देशमुख गेल्यानंतर घनश्याम हा रडताना दिसला. यावेळी अरबाज आणि निखिल हे घनश्याम याला समजून सांगताना देखील दिसले. मात्र, माझे काय चुकले हे विचारताना घनश्याम हा दिसला. घनश्याम बिग बॉस मराठीच्या घरात ढसाढसा रडताना दिसला.

काही वेळाने घनश्याम दरोडे याला समजवण्यासाठी पॅडी कांबळे हे पोहोचले. मात्र, यावेळी घनश्याम दरोडे हा पॅडी कांबळे यांना ठणकावून सांगताना दिसला की, मला काहीही झाले तरीही तुम्हाला अजिबात बोलायचे नाही. छोट्या पुढारीला तो व्हिडीओ पाहून मोठा धक्का बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बाहेर लोक हे घनश्याम याला सपोर्ट करताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;