नात्यांमध्ये व्यवहार नको, लाडक्या बहिणीला सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण हवे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
जम्मू कश्मीर आणि हरयाणातील निवडणुकांची घोषणा करण्यात आली अशली तरी महाराष्ट्रात निवडणुका डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपले मत व्यक्त करत महायुती सरकारवर हल्लाबेल केला आहे.
नाते आणि व्यवहार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांनीच नात्यांच्या तुलना पैशांशी केले आहे. बहीण-भावांच्या पवित्र नात्यात त्यांनी व्यवहार आणला आहे. लाडक्या बहिणीला सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण हवे, असे त्यांनी म्हटले आहे. कोणतंही नातं हे प्रेम आणि विश्वासाचे असतं, तिथे व्यवहार नसतो. नातं कोणतही असो ते फक्त आणि फक्त प्रेम व विश्वासाचे धाग्यानेच घट्ट बांधलेले असते आणि त्या आधारावरच ते टिकते. भाऊ-बहिणीच्या अशा पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा. आज या शुभेच्छा देत असतानाच मनामध्ये काही प्रश्न उभे राहतात, असे सुप्रिया सुळे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
लाडक्या बहिणीला सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण हवे…
कोणतही नातं हे प्रेम आणि विश्वासाचे असते, तिथे व्यवहार नसतो. नातं कोणतही असो ते फक्त आणि फक्त प्रेम व विश्वासाचे धाग्यानेच घट्ट बांधलेले असते व आधारावरच ते टिकते. भाऊ-बहिणीच्या अशा पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण… pic.twitter.com/ZwnJg5VNRW
— Supriya Sule (@supriya_sule) August 19, 2024
कितीही निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही. हा रडीचा डाव आहे. लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नाही तर यातच त्यांचे अपयश आहे. पैसे वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही. त्यांचे सरकार येणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा करणार आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List