Pune News – इंद्रायणी नदीत दोन मुलं बुडाली, शोध मोहीम सुरू
रक्षाबंधनाच्या सणाला गालबोट लावणारी घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. मोशी परिसरात सोमवारी सकाळी इंद्रायणीत दोन मुलं बुडाली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलांची शोधमोहीम सुरु आहे.
ही मुलं इंद्रायणी नदीवर कशासाठी गेली होती हे अद्याप कळू शकले नाही. सकाळी मुलं बुडाल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List