तीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला, सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला, सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले

घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू झाला. रक्षाबंधन सणाच्या पूर्व संध्येला घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली. वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी वनविभागा विषयी संताप व्यक्त केला आहे.

याबाबतचे वृत्त असे की चितळी ता.राहाता येथील मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकांवर घरा शेजारील डाळींबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्या ने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली.बाहेर असलेल्या आजी ने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या. मात्र बिबटया न सापडल्याने  घरच्यांनी डाळींब व मका शेतात इतरत्र शोध घेतल्या नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनीं गवतात रक्त भाबांळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी या वेळी सांगितले त्याला तातडीने पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तो मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;