Jayant Patil – भाजप आणि नवाब मलिक यांच्यात समझोता? जयंत पाटील यांनी व्यक्त केला संशय
नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने ते महायुतीमध्ये सामील झाले की काय अशी शंका उपस्थित होत आहे. मलिकांना सोबत घेण्याचं भाजपने मान्य केल्याचं दिसतंय असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे नवाब मलिक यांच्या ऐवजी त्यांची कन्या निवडणूक लढवणार असेल तर चालेल असा तोडगा भाजप काढला असावा असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मलिक यांनी अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. जेव्हा भाजपने मलिक यांच्यावर आरोप केले होते तेव्हा आपण मलिक यांच्या पाठीशी उभे होते असेही सुळे म्हणाल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List