Chhaava Teaser : विकी कौशलच्या ‘छावा’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!

Chhaava Teaser : विकी कौशलच्या ‘छावा’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!

अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रक्षाबंधनच्या निमित्ताने सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ‘स्वराज्याचे संरक्षक, धर्माचे रक्षक.. छावा – एका शूर योद्ध्याची महाकथा,’ असं कॅप्शन देत विकी कौशलने हा टीझर पोस्ट केला आहे. हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. टीझरमधील त्याचा रुद्रावतार पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. जवळपास एक मिनिटाच्या या टीझरमध्ये अभिनेता अक्षय खन्नाच्या भूमिकेचीही झलक पहायला मिळते.

‘छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और शेर के बच्चे को छावा..’ या दमदार संवादाने टीझरची सुरुवात होते. ‘छावा’ म्हणताच विकी कौशलची जबरदस्त एण्ट्री होते आणि युद्धाची काही दृश्ये पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. या टीझरमध्ये आणखी एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते ते म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. हा टीझर पोस्ट करताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

पहा टीझर-

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

‘अंगावर काटा आला’, असं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीने म्हटलंय. तर ‘तूच रे छावा’, असं आणखी एका युजरने म्हटलंय. कमेंटमध्ये अनेकांनी विकीच्या अष्टपैलू अभिनयकौशल्याचं कौतुक केलंय. ‘काही दिवसांपूर्वी ‘तौबा तौबा’ या गाण्यावरील डान्सने चाहत्यांना वेड लावणारा हाच विकी कौशल आता अत्यंत वेगळ्या भूमिकेत तितकाच शोभून दिसतोय’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या टीझरमध्ये सहज पहायला मिळतंय. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे.

‘छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून ‘स्त्री 2’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. यामध्ये विकी कौशलसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;