शीव रुग्णालयात महिला डॉक्टरवर हल्ला, कारण आले समोर

शीव रुग्णालयात महिला डॉक्टरवर हल्ला, कारण आले समोर

शीव रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी बहीण भावावर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी महिला डॉक्टरला शिव्या घातल्या होत्या आणि मारहाणही केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 वर्षीय पेशंट प्रसाद देवेंद्र याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा प्रसाद आपली बहीण श्वेतासोबत शीव रुग्णालयात आला होता. तेव्हा महिला डॉक्टर प्रसादवर उपचार करत होती. चेहऱ्यावरच्या जखमेवरचा कापूस काढताना प्रसादला दुखलं तेव्हा तो जोरात ओरडला. भावाच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून बहीण श्वेत धावून आली. तेव्हा भावाला सांभाळण्याऐवजी तिने डॉक्टरलाच शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही बहीण भावांनी मिळून महिला डॉक्टरला मारहाण केली.

महिला डॉक्टरने जेव्हा आरडा ओरड केली तेव्हा सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयाचे कर्मचारी धावून आले. तेव्हा प्रसाद आणि श्वेताने पळ काढला. पोलिसांनी दोघांना शोधून काढले आणि दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;