Stree 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’चाच बोलबाला; अवघ्या चार दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

Stree 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’चाच बोलबाला; अवघ्या चार दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरू आहे. पहिल्याच दिवशी ‘स्त्री 2’ने कमाईच्या बाबतीत ‘अॅनिमल’ आणि ‘पठाण’ या दोन मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं होतं. मोठ्या वीकेंडचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. म्हणूनच रविवारीसुद्धा श्रद्धा आणि राजकुमारच्या ‘स्त्री 2’ने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईने बजेटचा आकडाही पार केला आहे. पहिल्याच आठवड्यात तो ब्लॉकबस्टर ठरला आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 60 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 200 कोटींच्या कलेक्शनजवळ पोहोचला आहे. हा चित्रपट लवकरच कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रविवारी या चित्रपटाने 55 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंतचा ‘स्त्री 2’च्या कमाईचा आकडा 190.55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटाला रक्षाबंधनच्या सुट्टीचाही चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

‘स्त्री 2’ची आतापर्यंतची कमाई-

पहिला दिवस- 64.8 कोटी रुपये
दुसरा दिवस- 35.3 कोटी रुपये
तिसरा दिवस- 45.7 कोटी रुपये
चौथा दिवस- 55 कोटी रुपये

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी जानेवारी महिन्यात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाने 24.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने 95 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र ही कमाई हिंदी, तेलुगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये मिळून झाली होती.

या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. ‘स्त्री 2’मध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, जी तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतील. तर काही अशीही दृश्ये आहेत, जी पाहून तुमची घाबरगुंडी उडेल. चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘स्त्री’ची दहशत पहायला मिळाली होती. आता दुसऱ्या भागात ‘सरकटे’ची दहशत पहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे या सीक्वेलची कथा नवीन आणि रंजक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;