नवी मुंबई विमानतळाची एक धावपट्टी एकदम ओक्के, दुसऱ्या धावपट्टीसाठी विमान पुन्हा घिरट्या घालणार

नवी मुंबई विमानतळाची एक धावपट्टी एकदम ओक्के, दुसऱ्या धावपट्टीसाठी विमान पुन्हा घिरट्या घालणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्यांपैकी एका धावपट्टीची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे ही धावपट्टी एकदम ओक्के झाली आहे. आता दुसऱ्या धावपट्टीच्या चाचणीसाठी हवाई प्राधिकरणाचे विमान पुन्हा नवी मुंबईत घिरट्या घालणार आहे. या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर धावपट्टीवरील लायटिंग आणि रडार यंत्रणेची चाचणी होणार आहे. त्यानंतर व्यावसायिक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात येणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 31 मार्च 2025 ही डेडलाईन असल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक त्या चाचण्या सुरू केल्या आहेत. सिग्नल यंत्रणा आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या चाचणीला विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने 17 जुलै रोजी सुरुवात करण्यात आली. ही चाचणी दोन दिवस घेतली जाणार होती.

मात्र दुसऱ्या दिवशी नवी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात धो धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे ही दोन दिवसांची चाचणी पुढे ढकलण्यात आली. मात्र पावसाचा जोर कमी न झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने अनिश्चित काळासाठी चाचणी लांबणीवर टाकली. नंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे दोन दिवस नवी मुंबईत पुन्हा विमानाने घिरट्या घातल्याआणि दोन दिवसांची ही चाचणी पार पडली.

नवी मुंबई विमानतळावर सध्या दोन धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठ क्रमांकाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता 28 क्रमांकाच्या धावपट्टीची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी बहुतेक या महिन्यांच्या अखेरपर्यंत किंवा सप्टेबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. या चाचणीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्यामुळे विमानतळाच्या विविध चाचण्या घेण्यासाठी हवाई प्राधिकरणाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे, असे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;