बनावट दारुनिर्मितीच्या कारखान्यावर छापा, सांगलीत सातजणांवर गुन्हा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट दारुनिर्मितीच्या कारखान्यावर छापा, सांगलीत सातजणांवर गुन्हा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गोवा राज्यातच विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून महाराष्ट्रातील कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने आज उघडकीस आणला. भरारी पथकाने विजयनगर चौकात तिघांना दारूची तस्करी करताना पकडून नंतर परिसरातील फ्लॅटवर छापा मारला. फ्लॅटमधील छोटेखानी कारखान्यात बनावट झाकणे लावून दारू सीलबंद करण्यात येत होती. दरम्यान, सांगली जिह्यात बनावट दारूचे पेव फुटले असून, याला केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

सांगली येथे भरारी पथकाच्या कारवाईत अब्दुलरझाक नजरुद्दीन मुलाणी (वय 26, रा. जमगे गल्ली, कवठे महांकाळ), महम्मदकैफ बशीर बागवान (वय 20, रा. थबडेवाडी रस्ता, कवठे महांकाळ), सिद्दीक मुबारक नदाफ (वय 18, रा. दादा चौक, कवठे महांकाळ) या तिघांना अटक करण्यात आलीत. तपासात पुरवठादार व ग्राहक अशा चौघांवरही कारवाई केली. या कारवाईत भरारी पथकाने एकूण 10 लाख 29 हजारांचा मुद्देमाल कारवाईत जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला सांगली येथील विजयनगर चौकातील सत्राळकर स्क्वेअर इमारतीच्या पूर्वेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मोटार क्रमांक (एमएच 13, सीएस 795) थांबवली. मोटारीची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारूचे 21 बॉक्स आढळले. मोटार तसेच दुचाकी क्रमांक (एमएच 10, ईएच 1501) असा मुद्देमाल जप्त केला. तिघांच्या चौकशीत हा दारूसाठा विजयनगर येथील शिवदत्त आनंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे छापा टाकला, तेव्हा गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून येथे आणली जात असल्याची माहिती मिळाली.

सांगलीत बनावट दारूची सर्रास विक्री; प्रशासन आणि राज्यकर्ते उदासीन

z सांगली जिह्यातील अनेक परवानाधारक सरकारमान्य बिअरबारमध्ये अशाच प्रकारची दारूची विक्री सर्रास करीत आहेत. अशी तक्रार नागरिकांतून होत आहे. हे सर्व बिअरबार आणि वाईन शॉप कर्नाटक आणि उडपी मालकांच्या हातात आहेत. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांचे या सर्व प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत. सांगली जिल्हा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत असल्याने हा गोरखधंदा या मंडळींनी मोठय़ा प्रमाणात अवलंबला आहे. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांचे पाठबळ आहे. आज उघड झालेल्या गोवा बनावटीच्या दारू प्रकरणाप्रमाणेच जिह्यात अनेक ठिकाणी बनावट दारूनिर्मिती आणि विक्री होत असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासन आणि राज्यकर्ते याबाबत उदासीन दिसून येत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;