प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यात इतकी भरभर..; दीपिका पादुकोणच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा सवाल

प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यात इतकी भरभर..; दीपिका पादुकोणच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा सवाल

अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असून नुकतंच तिला मुंबईत पाहिलं गेलं. रविवारी रात्री दीपिका एका कार्यक्रमाला उपस्थित होती. कार्यक्रमातून बाहेर पडतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याच व्हिडीओवरून पुन्हा एकदा नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. दीपिकाने फेब्रुवारी महिन्यात गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र त्यानंतर बेबी बंप दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. इतकंच नव्हे तर जेव्हा दीपिका बेबी बंपसह दिसली, तेव्हासुद्धा ते ‘फेक’ असल्याची टीका काहींनी केली. आता गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात दीपिकाच्या चालण्यावरून नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दीपिकाने पंजाबी सूट परिधान केल्याचं दिसतंय. यात तिचा बेबी बंपही सहज दिसून येतोय. कार्यक्रमातून बाहेर पडून दीपिका तिच्या कारमध्ये बसते. मात्र ज्या सहजतेने ती चालते आणि कारमध्ये बसते, ते पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यात ती इतकी सहज कशी चालू शकते’, असं एकाने विचारलंय. तर ‘किती सहजरित्या ती कारमध्ये जाऊन बसली,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मी नुकतीच आई झाले. महिला उंच असो, बुटकी असो, जाड किंवा बारिक असो.. तिला गरोदरपणात चालताना, बसताना थोडा वेळ तर लागतोच. पण दीपिका इतक्या सहजतेने सर्वकाही  कसं करतेय’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी आतूर झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असताना दीपिका आणि रणवीर सिंह हे आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला होता. मात्र त्यानंतरही काहींनी दीपिकाला ट्रोल केलं होतं. मे महिन्यात जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हासुद्धा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;