Video दुसऱ्या मजल्यावरून कोसळला एसी, 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Video दुसऱ्या मजल्यावरून कोसळला एसी, 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

एका 18 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दुसऱ्या मजल्यावरून एसी कोसळला आहे. या दुर्घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दिल्लीत शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास जितेश चढ्ढा हा तरुण स्कूटरवर बसून आपल्या मित्राशी बोलत होता. तेव्हा दुसऱ्या मजल्यावरून एसीचा भाग खाली कोसळला आणि तो थेट जितेशच्या डोक्यावर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की जितेश खाली कोसळला आणि यात त्याच्या मित्रालाही गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण जितेशला उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर जितेशच्या मित्रावर उपचार केले असून त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;