युवतींच्या टी-20 वर्ल्ड कपचा थरार मलेशियात, नव्या वर्षात रंगणार स्पर्धा; एकाच दिवशी 6-6 सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) रविवारी 19 वर्षांखालील महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले. नववर्षात म्हणजेच 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत मलेशियात या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या 41 सामन्यांच्या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. एकाच दिवशी 6-6 सामन्यांचे आगळेवेगळे वेळापत्रक यावेळी बनविण्यात आले आहे.
मलेशियातील चार ठिकाणी या स्पर्धेतील सामने होणार आहेत. गतविजेत्या हिंदुस्थानला वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि यजमान मलेशियासह ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. सेलांगॉरमधील ब्युमास ओव्हल येथे ‘अ’ गटाचे सर्व सामने आणि अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जोहोर येथील दातो डॉ. हरजित सिंग जोहर क्रिकेट अकादमी (जेसीए ओव्हल) येथे ‘ब’ गटाचे सामने होणार आहेत. याचबरोबर सारवाकमधील बोर्नियो क्रिकेट ग्राऊंडवर ‘क’ गटाचे, तर सेलंगोरमधील यूकेएम वायएसडी ओव्हल येथे ‘ड’ गटातील सामने होतील. 1 फेब्रुवारी हा उपांत्य फेरीसाठी आणि 3 फेब्रुवारी हा अंतिम फेरीसाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेची गटवारी
‘अ’ गट ः हिंदुस्थान, वेस्ट इंडीज, श्रीलंका, मलेशिया.
‘ब’ गट ः इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका.
‘क’ गट ः न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आफ्रिका पात्रता, सामोआ.
‘ड’ गट ः ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, आशिया पात्रता, स्कॉटलंड.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List