रक्षाबंधनासाठी सातारला जाणाऱ्या युवकावर मेढय़ात काळाचा घाला

रक्षाबंधनासाठी सातारला जाणाऱ्या युवकावर मेढय़ात काळाचा घाला

रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ आडव्या आलेल्या एसटीला दुचाकी धडकून त्याचा मृत्यू झाला. आदित्य संजय साळुंखे (वय 23, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा) असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

आदित्य हा रत्नागिरी जिह्यातील खेड येथील योगिता डेंटल कॉलेजला बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकायला होता. रक्षाबंधनानिमित्त तो पल्सर मोटारसायकलवरून महाबळेश्वरमार्गे सातारला येत होता. सातारा अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. मेढा बसस्थानकाजवळ आदित्यची दुचाकी अचानक आडव्या आलेल्या एसटीवर आदळली. या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला, त्याचे हेल्मेटही तुटले.

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य बोलू शकत होता. त्याने आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले. त्यावेळी त्याच्या घरच्यांना कळवतानाच लोकांनी जखमी आदित्यला मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पण तो गंभीर जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सातारला सर्वसाधारण रुग्णालयात हलवण्यास सांगितले. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून त्याला सातारला हलवण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता. आदित्यच्या अपघाताची माहिती कळताच याचे कुटुंबही शोकसागरात बुडून गेले. रात्री झालेल्या अपघाताची मेढा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;