नागपूर जिल्हा न्यायालयात वकिलाचा मृत्यू, हार्टअटॅक आल्यानंतर न्यायाधीश मदतीला धावले

नागपूर जिल्हा न्यायालयात वकिलाचा मृत्यू, हार्टअटॅक आल्यानंतर न्यायाधीश मदतीला धावले

न्यायालयाचे कामकाज सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका येवून ते खुर्चीतून जमिनीवर कोसळले. ही बाब न्यायाधीशांच्या लक्षात येताच, त्यांनी इतरांच्या मदतीने वकिलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. न्यायाधीशांनी वकिलाला तातडीने उपचार मिळावा म्हणून धावपळ केली, पण त्यांना यश आले नाही. वकीलाची प्राणज्योत मालवली. नागपूर जिल्हा न्यायालयातील या हृदयद्रावक घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ वकील इकबाल कुरेशी (64) न्यायालयीन कामकाजासाठी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा न्यायालयात पोहचले. सातव्या मजल्यावरील दिवाणी न्यायालयात त्यांच्या एका प्रकरणावर सुनावणी होणार होती. प्राथमिक सुनावणीत त्यांनी कोर्टाला प्रकरणाची माहिती दिली आणि न्यायनिवाडे सादर केले. त्यानंतर ते खुर्चीत बसले. प्रतिपक्षाच्या वकिलांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कुरेशी हे खुर्चीतून खाली कोसळले. न्यायाधीश एस. बी. पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ते न्यायासनावरुन उठले आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने वेळ न दवडता कुरेशी यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची धावपळ केली. न्यायालयात स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. त्यांना खूर्चीवर बसवून लागलीच तळमजल्यावर आणण्यात आले. न्यायाधीश पवार यांनी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे आणि इतर सदस्यांना याची माहिती दिली. कुरेशी यांना स्वतःच्या वाहनातून तताडीने जवळच्या रुग्णालयात नेले. पण कुरेशी यांना वाचवण्याची शर्थ व्यर्थ ठरली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. कोरोना काळात कुरेशी यांच्या पत्नीचे निधन झाले. दोन मुलींचे लग्न झालेले आहेत. कुरेशी हे एकटेच राहत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;