बॉलीवुड सोडणार आमिर खान ! रियाच्या पॉडकास्टवर अभिनेत्याच्या डोळ्यांत अश्रू

बॉलीवुड सोडणार आमिर खान ! रियाच्या पॉडकास्टवर अभिनेत्याच्या डोळ्यांत अश्रू

आमीर खान हे एक हरहुन्नरी अभिनेते असून त्यांना परफेक्टनिस्ट म्हटले जाते. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीने तिच्या पॉडकास्ट चॅप्टर – 2 या कार्यक्रमात आमिर खानने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. या मुलाखतीत आमिर खान याने बॉलीवुड सोडणार असल्याचे म्हटले आहे. रिया चक्रवर्ती यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवरुन आपल्या पॉडकास्टचा ट्रेलर रिलीज केला आहे.

आमिर खान याचा रिया चक्रवर्ती हीने खास इंटरव्यूह घेतला आहे. यात आमीर खान अनेक विषयावर आपली मते मांडली आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीने या ट्रेलरला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहीले आहे की मी माझ्या पॉडस्टारवर एका सच्चा स्टार आणि सच्चा मित्र आमिर खानचे स्वागत करताना रोमांचित झाले आहे. स्टारडम, पितृत्व, दु:ख आणि त्याच्या सोबतचा अनुभव जाणणे हे महत्वाचे ठरणार आहे. चॅप्टर – 2 हा एपिसोड शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

रिया यांनी आमिर खान यांना सवाल केला आहे. त्या म्हणाल्या की तुम्ही जेव्हा आरशात स्वत:ला पाहाता. तेव्हा तुम्हाला तु्म्ही खुप गुड लुकींग आहात. मी स्टार आहे की मी आमीर खान आहे. हे ऐकून आमिर खान याला हसू आले. ते पुढे म्हणाले की तुम्हाला अद्भूत साहस दाखवले पाहीजे रिया, मी मॅजिकवर विश्वास ठेवतो. पुढे अभिनेता म्हणाला की मला फिल्ममधून बाहेर पडायचे आहे. तेव्हा रिया यांनी हे खोटं आहे असे म्हटले. त्यावर आमिर खान यांनी  हे खरंच आहे असे म्हटले आहे. त्यावर रिया  म्हणाली लाय डिटेक्टर टेस्ट करुया…का ?  तेव्हा आमिर म्हणाले करा हवी तर…

आमिर खानच्या डोळ्यात अश्रू

या मुलाखतीत आमिर खानच्या डोळ्यात एका प्रश्नाला अश्रू ओघळले. ते डोळे पूसू लागताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. या एपिसोडची ही एक छोटीसी झलक आहे. त्यामुळे आमिर खान नेमके कोणत्या मुद्यावर इमोशनल झाले हे कळलेले नाही. परंतू अभिनेत्याने इमोशनल होत सांगितले की त्यावेळी माझ्या साठी ही कठीण स्थिती होती. माझा चॅप्टर 2 तेथूनच सुरु झाली. रिया आणि आमिर खान यांच्या दरम्यानच्या चर्चेचा संपूर्ण व्हिडीओ तु्म्ही 23 ऑगस्ट रोजी रिया चक्रवर्ती यांच्या युट्युब चॅनलवर पाहू शकणार आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;