महायुती सरकारच्या सूडाच्या राजकारणाने हद्द केली, नितीन देशमुखांच्या मुलांच्या शाळेच्या खर्चाची एसीबीची चौकशी
विरोधकांवर सूडाचं राजकारण सुरुच आहे. हे राजकारण किती खालच्या पातळीला गेले याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार यांच्या नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शाळेच्या खर्चाची चौकशी एसीबीकडून लावण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शाळेवर किती खर्च झाला हे जाणून घेण्यासाठी चक्क एसीबीमार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसे पत्र एसीबीने शाळेला दिले आहे.
नितीन देशमुख यांच्या विरोधात काहीच सापडत नसल्यामुळे आता त्यांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचा आणि दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या शालेय शिक्षणावर किती खर्च झाला याची चौकशी एसीबीकडून केली जात आहे. देशमुख यांची मुलं शिकत असलेल्या प्रभात किड्स या शाळेला तसे पत्र पाठवण्यात आलं आहे. यात देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च झाला याचा तपशील शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालकांकडून मागवला आहे.
काही दिवसांपूर्वी नितीन देशमुख गाडीमध्ये किती डिझेल-पेट्रोल भरतात? याचीही विचारपूस पेट्रोलपंप चालकांकडे काही अधिकाऱ्यांनी केली होती. नितीन देशमुखांनी शिंदेंसोबत न जाता ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना सुरतमधून चार्ट्ड प्लेनने महाराष्ट्रात पाठवण्यात आलं.
वास्तविक हे चार्टर्ड प्लेन कोणी दिलं, त्याचे पैसे कुठुन आले याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
तसेच अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्यापैकी कोणकोणत्या नेत्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणाबद्दलचा तपशील मागवला आहे, हे देखील एसीबीने सांगावं असे देशमुख म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List