Nashik News – कसारा घाटात भीषण अपघात, टँकर 300 फूट दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

Nashik News – कसारा घाटात भीषण अपघात, टँकर 300 फूट दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. नाशिकहून मुंबईकडे जाणारा दूधाचा टँकर थेट 300 फूट दरीत कोसळला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अवैधरित्या प्रवाशी बसवणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. जोरदार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. मात्र आपत्ती व्यवस्थापन टीमने अथक प्रयत्नांनी दोरीच्या सहाय्याने जखमी आणि मयतांना बाहेर काढले.

विजय घुगे, आरती जायभाय, सार्थक वाघ, रामदास दराडे आणि योगेश आढाव अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. तर अक्षय विजय घुगे, श्लोक जायभाय, अनिकेत वाघ आणि मंगेश वाघ अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा आणि उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्गचे डीवायएसपी प्रदीप मैराळ, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, महामार्गचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. होंडे, पोलीस उपनिरीक्षक पी. साळुंके, पोलीस हवालदार सुनील खताळ, अमोल केदारे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बेंडकुळी, प्रवीण चासकर यांनी मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;