UPSC नाही तर RSS मार्फत सरकारी पदांची भरती, IAS चे खासगीकरण ही मोदींची गॅरंटी; राहुल गांधीचा घणाघात

UPSC नाही तर RSS मार्फत सरकारी पदांची भरती, IAS चे खासगीकरण ही मोदींची गॅरंटी; राहुल गांधीचा घणाघात

केंद्रिय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी पदांची भरती करून संविधानावर हल्ला करत असल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली आहे. आरक्षण आणि सरकारी पदभरती या मुद्द्यांवरून लोकभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरत केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला.

राहुल गांधी यांनी ट्वीटरवर (X) ट्वीट करत नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, “केंद्र सरकारच्या मंत्रालयातील विविध महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून SC, ST आणि OBC प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे. मी नेहमी म्हणत आलो आहे की, वंचितांना देशातील सर्वोच्च पदांवर प्रतिनिधित्व दिले जात नाही. या परिस्थिती सुधारणा करण्याऐवजी त्यांना लॅटरल एंट्रीद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे. हा UPSC ची तयारी करणाऱ्या हुशार आणि होतकरू तरुणांच्या हक्कावरचा दरोडा आणि वंचितांच्या आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर केलेला हल्ला आहे.” असं म्हणत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फोडली

“काही कॉर्पोरेट्सचे प्रतिनिधी महत्त्वाच्या सरकारी पदांवर विराजमान होऊन शोषण करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे SEBI, जिथे खासगी क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीला प्रथमच अध्यक्ष केले गेले. प्रशासकीय संरचना आणि सामाजिक न्याय या दोघांनाही धक्का देणाऱ्या या देशविरोधी पाऊलाचा इंडीया तीव्र विरोध करेल. IAS चे खासगीकरण, ही आरक्षण संपवण्याची ‘मोदींची गॅरंटी’ आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;